शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार बांधकाम मजुरांना मिळणार दीड हजार रुपये- लाॅकडाऊन : हजारो कामगार राहू शकतात मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

धुळे आणि नंदुरबार जिल्हा मिळून २०११ पासून तब्बल ३५ हजार ५९८ बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे. धुळे जिल्ह्यातील कामगारांची ...

धुळे आणि नंदुरबार जिल्हा मिळून २०११ पासून तब्बल ३५ हजार ५९८ बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे. धुळे जिल्ह्यातील कामगारांची संख्या अंदाजे २० हजारपेक्षा अधिक आहे. परंतु नोंदणीचे नूतनीकरण केलेले कामगार केवळ ६ हजार ३२० च्या आसपास आहेत. सरसकट सर्व नोंदणीकृत कामगारांना मदत मिळाली, तर काही प्रश्न नाही. परंतु नूतनीकरणाचा निकष लावला, तर केवळ ६ हजार ३२० कामगारांना मदत मिळणार आहे. इतर २० हजारपेक्षा अधिक कामगार मदतीपासून वंचित राहू शकतात.

कामगारांना नूतनीकरणाची संधी

जिल्ह्यातील ज्या बांधकाम कामगारांनी २०१९ च्या जून, जुलै, ऑगस्टमध्ये नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण केले आहे, त्या कामगारांना नूतनीकरण करण्याची संधी आहे. वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यानंतर नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण होते. २० हजारपैकी १३ ते १४ हजार मजुरांनी नूतनीकरण केले नसल्याने शासनाच्या रेकाॅर्डवर ते कामावर नसल्याचे दिसते. सध्या जिल्ह्यात केवळ ६ हजार ३२० कामगार सक्रिय असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.

आमच्या पोटापाण्याचे काय

शासनाने १५ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केल्यामुळे रोजगार बंद झाला आहे. शासनाने १५०० रुपये मदत जाहीर केली असली, तरी त्यातून घरभाडे द्यायचे की किराणा माल भरायचा, असा प्रश्न पडला आहे. - विठ्ठल मोरे, बांधकाम मजूर

संचारबंदी जाहीर करून शासनाने मदतही जाहीर केली. लाॅकडाऊन सुरू झाले; पण मदत कधी मिळणार, असा प्रश्न आहे. प्रशासनाशी संपर्क केला, तर जीआर आला नसल्याचे सांगण्यात आले. - गजानन गिरासे, बांधकाम मजूर

मागीलवर्षीचा अनुभव फार वाईट आहे. लाॅकडाऊन जाहीर होते, मदतीची घोषणाही होते; परंतु मदत मात्र लाॅकडाऊन संपल्यावर मिळते. जो आधार लाॅकडाऊनमध्ये मिळायला हवा, तो मिळत नाही. - बालाजी अहिरे, बांधकाम मजूर