शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

एकूण रुग्णांपैकी ५३ टक्के रुग्ण धुळे शहरातील, १३ ते १९ मार्च : आठवडाभरात आढळलेल्या २५२१ पैकी १३४२ रुग्ण शहरातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

मागीलवर्षी जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव धुळे शहरात झाला होता. रुग्ण आढळण्यासोबतच मृतांची संख्याही जास्त होती. आता रुग्णवाढीच्या दुसऱ्या टप्प्यातही ...

मागीलवर्षी जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव धुळे शहरात झाला होता. रुग्ण आढळण्यासोबतच मृतांची संख्याही जास्त होती. आता रुग्णवाढीच्या दुसऱ्या टप्प्यातही शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. शहरातील सर्वच भागात रुग्ण आढळत आहेत. साक्री रोड, देवपूर, वडीभोकर रोड, गोंदूर रोड या भागांचा त्यात समावेश आहे. तरीही बाजारातील गर्दी मात्र कमी होताना दिसून येत नाही. तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. नागरिकांची बेफिकिरी थांबली तरच कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकतो.

चार रुग्णांचा मृत्यू

- १३ ते १९ मार्च या कालावधीत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेताना एकाचा मृत्यू झाला आहे, तर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना तीन रुग्ण दगावले. मृतांमध्ये धुळे शहरातील तीन व साक्री येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

सलग चार दिवस २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळले -

या आठवडाभरात धुळे शहरात सलग चार दिवस २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. १५ मार्च रोजी जिल्ह्यातील ५१५ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यात धुळे शहरातील २५२ रुग्णांचा समावेश होता. तसेच १६ रोजी आढळलेल्या ४५३ रुग्णांमध्ये शहरातील २३८ रुग्णांचा समावेश होता. १७ मार्च रोजी ४०६ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात शहरातील २०८ जणांचा समावेश होता, तर १८ रोजी जिल्ह्यातील ४९४ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात धुळे शहरातील २९० अहवाल होते. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसून येत असून, प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.