४४ हजार १८२ भांड्यामध्ये डासउत्पत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:12 IST2019-11-04T23:11:35+5:302019-11-04T23:12:12+5:30
मनपा : चुकीचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नोटीस

dhule
धुळे : शहरात डेंग्यू नियंत्रणासाठी विशेष मोहीम २६ आॅक्टोंबरपासून राबविण्यात येत आहे़ आतापर्यत ५० हजार घरांना भेटी देण्यात आल्या असुन यात ९५ हजार पाणी साठ्याची झाली़ यामध्ये ४४ हजार १८२ भांड्यामध्ये डासउत्पत्ती आढळली़ तर ९ घरमालकांना नोटिसा बजावल्या.
शहरात डेंग्यूने चांगलेच डोके वर काढले आहे़ त्यात महापालिकेची यंत्रणा लोकसंख्येच्या तुलनेत तोकडी ठरत असल्याने उपाय योजना करतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक होते़ त्यामुळे मनपाला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो़ मात्र यंदा मलेरियाची रूग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे़ आॅगस्ट ते २४ आॅक्टोबरदरम्यान ३६९ संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापेैकी एका रूग्णाचा अहवाल प्रयोगशाळेतून पॉझिटीव्ह आला आहे़ सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक झाला. या महिन्यातील संशयित १०२ पैकी ४५ रुग्ण डेंग्यू पॉझिटीव्ह आढळून आले. तेच १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान २६६ संशयित रुग्णांपैकी १०२ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर १५ ते २४ आॅक्टोबरदरम्यानच्या ७८ संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.
उपाययोजना सुरूच
डेंग्यू नियंत्रणासाठी शहरात अॅबेटिंग, फवारणी, धुरळणीचे केली जात आहे़ काम ज्या भागात रूग्ण आढळून येतील, त्या भागात करण्यात येत आहे़ त्याचप्रमाणे डॉक्टरांनी प्राथमिक चाचणीच्या आधारे डेंग्यूचे निदान करू नये यासाठी महापालिकेने दवाखाने, पॅथॉलॉजी लॅबला पत्र देऊन कारवाईचा इशारा देखील मनपा आरोग्य विभागाने दिला आहे़