२३ बंधाऱ्यांना मिळाली मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:39 IST2021-05-20T04:39:02+5:302021-05-20T04:39:02+5:30
धुळे तालुक्यात सिंचनाच्या कामांना प्राधान्य देत विविध सिंचनाची कामे करण्यासाठी आ. कुणाल पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून बंधार्यांच्या कामांना ...

२३ बंधाऱ्यांना मिळाली मंजुरी
धुळे तालुक्यात सिंचनाच्या कामांना प्राधान्य देत विविध सिंचनाची कामे करण्यासाठी आ. कुणाल पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून बंधार्यांच्या कामांना मंजुरी मिळवून घेतली आहे. महाराष्ट्र जलसंधारण मंत्रालयाकडे ही कामे सुचविली होती. त्यामुळे धुळे तालुक्यातील एकूण २३ बंधार्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यात मांडळ, कुळथे (२ बंधारे), बोरकुंड, विंचूर, फागणे (२ बंधारे), रावेर, तिखी, रामी, अंबोडे (२ बंधारे), शिरधाणे प्र.डा., सायने, विश्वनाथ (२ बंधारे), वार, दोंदवाड, वजीरखेडे, कापडणे, निमगूळ, मोरदड (२ बंधारे) या गावांच्या शिवारातील नाल्यांवरील बंधार्यांचा समावेश आहे. या कामांमुळे बंधार्यांच्या परिसरातील १५५ हेक्टर शेती सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. या कामांसाठी जलसंधारण मंत्रालयाकडून एकूण १० कोटी ३० लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. बंधार्यांच्या कामामुळे सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होऊन शेतकर्यांचा मोठा फायदा होणार आहे. आ. कुणाल पाटील यांनी ही कामे मंजूर केल्यामुळे शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.