जिल्ह्यात १०९ जणांना डेंग्यूंचा डंख; शहरी भागात सर्वाधिक ६१ रुग्णसाथीच्या आजारांची रुग्णसंख्याही वाढली; प्रभावी उपाययोजनांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:42+5:302021-09-05T04:40:42+5:30
दरम्यान, आरोग्य विभागाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. धुरळणी आणि औषधांची फवारणी केली जात आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी ...

जिल्ह्यात १०९ जणांना डेंग्यूंचा डंख; शहरी भागात सर्वाधिक ६१ रुग्णसाथीच्या आजारांची रुग्णसंख्याही वाढली; प्रभावी उपाययोजनांची गरज
दरम्यान, आरोग्य विभागाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. धुरळणी आणि औषधांची फवारणी केली जात आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन साचलेल्या पाण्यात औषधांची फवारणी करीत आहेत, तसेच जनजागृतीदेखील केली जात आहे.
कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे काहीशी सारखीच असतात. त्यामुळे त्रास होत असेल तर दुखणे अंगावर काढणे धोकेदायक ठरू शकते. कोरोना व डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये त्वरित उपचार आवश्यक आहेत. त्यामुळे तत्काळ चाचणी करणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंग्यूचे रुग्ण वाढतात, तसेच डेंग्यू व कोरोना दोन्हीमध्ये ताप, अंगदुखी आदी लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करून घ्यावी. कोरोनासाठी आरटीपीसीआर, तर डेंग्यूसाठी इलायझा चाचणी करावी.
कोरोना व डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये ताप जास्त प्रमाणात येतो, तसेच अंगदुखीचा त्रास होतो.
कोरोनामध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण अधिक असते. डेंग्यूमध्ये मात्र सर्दी खोकला होत नाही.
डेंग्यूमध्ये डोळे दुखतात. कोरोनाच्या काही रुग्णांमध्येही अशी लक्षणे आहेत.
साथीच्या आजारांसाठी ही घ्या काळजी
वातावरणातील बदलांमुळे साथीचे आजारही बळावले आहेत. अनेकांना हिवताप आणि अंगदुखीचा त्रास आहे. दवाखाने फुल्ल आहेत. लहान मुलांमध्ये देखील साथीचे आजार बळावले आहेत. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असते. म्हणून पाणी उकळूनच प्यावे. जिल्ह्यातील जलस्रोतांची आरोग्य विभागाने तपासणी केली होती. त्यात १३ गावांतील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले होते.
डास नियंत्रणासाठी कोरडा दिवस पाळा
पावसाळ्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असते, तसेच विषाणूत देखील बदल होतो. विषाणूचा बदल रोखणे आपल्या हातात नाही, पण परिसर स्वच्छ ठेवल्यास डासांची उत्पत्ती आपण रोखू शकतो. एक कोरडा दिवस पाळावा.
- डॉ. अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी.