शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी जीवनाचा 100 वर्षाचा खळखळता झरा

By admin | Updated: May 4, 2017 12:41 IST

आरोग्यम धनसंपदा : शिवसेनेतर्फे नारायण क्षीरसागर यांचा यथोचित सन्मान.

 ऑनलाईन लोकमत विशेष /आबा सोनवणे  

साक्री, जि.धुळे, दि.4- ‘आरोग्यम धनसंपदा’ असे संस्कृतमध्ये वचन आहे. जीवन जगत असताना पैसे, धन, संपत्ती नसली तरी चालेल परंतू उत्तम आरोग्य असायला हवे. श्रीमंती मिळवणारे किंवा भोगणारे जगात अनेक गर्भश्रीमंत आहेत, परंतू त्यांना कोणालाही आयुष्याची 100 वर्ष पूर्ण करता आलेली नाही. याला कारण पैसे मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेले असते.
परंतू खेडेगावात राहून शेती व्यवसाय करुन संपूर्ण कुटुंबाची देखरेख करत त्यांनाही मार्गाला लावणारे नारायण देवराव क्षीरसागर यांनी 3 मे रोजी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला. 80 टक्के समाजकारण व 20 टकके राजकारण करणा:या शिवसेनेने यानिमित्ताने त्यांचा यथोचित सत्कार केला.  शिवसेना प्रमुख विशाल देसले, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख अमोल क्षीरसागर,  बहिरम देव उत्सव समिती, जय ज्योती जय क्रांती मित्र मंडळ यांनी त्यांचा सत्कार केला. नारायण क्षीरसागर यांचा जन्म 3 मे 1917 चा आहे. दररोज पहाटे 5 वाजता उठणे, अंगण झाडणे, त्यानंतर आंघोळ, परिपाठ करणे, वर्तमानपत्र न चुकता वाचणे हा त्यांचा नित्यक्रम आहे.
आयुष्यभर कोणतेही व्यसन नाही, सकारात्मक विचारसरणी, शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण ते घेतात, त्यांना तीन मुले मोठा मुलगा भदू नारायण क्षीरसागर, मुरलीधर व अजरून क्षीरसागर दोन मुले शेती करतात तर भटू क्षीरसागर यांचे वय आज 68 वर्ष आहे. 
आजच्या धकाकीच्या जीवनात जरी त्यांचे आयुष्य कमी खर्ची पडले असले तरीही पूर्वीच्या काळातील सकस आहार, कष्ट करण्याची प्रवृत्ती, सकारात्मक विचारसरणी हीच खरी त्यांच्या निरोगी जीवनाची गुरुकिल्ली ठरली आहे. त्यासोबत गेल्या 40 वर्षापासून वडीलांची सेवा करणारे मुरलीधर क्षीरसागर, त्यांचा सुपुत्र प्रदिप क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबियांवर ही याचे श्रेय जाते. नारायण क्षीरसागर यांनी आपल्या कुटुंबाच्या योगदानाने आपल्या आयुष्याची 100 वर्ष पूर्ण करुन समाजाला निरोगी जीवनाचा व आदर्शकुटूंब व्यवस्थेचा धडा घालून दिला आहे.