फ्रंटलाइन वर्कर्ससाठी कोविड रुग्णालयात १० टक्के बेड आरक्षित करण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:24+5:302021-04-24T04:36:24+5:30

निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांना कोरोनासंदर्भातील काम लावताना वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश न देता, तोंडी ...

10% beds should be reserved for frontline workers in Kovid Hospital | फ्रंटलाइन वर्कर्ससाठी कोविड रुग्णालयात १० टक्के बेड आरक्षित करण्यात यावे

फ्रंटलाइन वर्कर्ससाठी कोविड रुग्णालयात १० टक्के बेड आरक्षित करण्यात यावे

निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांना कोरोनासंदर्भातील काम लावताना वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश न देता, तोंडी आदेशाने सूचना देऊन कोरोनाचे कर्तव्य पार पाडायला लावत आहेत. दुर्दैवाने कोविडच कर्तव्य बजावत असताना, एखाद्या शिक्षकास कोरोनाने आपला जीव गमवावा लागला, तर शासनाने जाहीर केलेल्या पन्नास लाख रुपयांचे कोविड सुरक्षा विमा कवचचा लाभ कुटुंबातील सदस्यांना मिळणार नाही, त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे लेखी आदेश ग्राह्य मानले जातात. म्हणून प्राथमिक शिक्षकांना कोविड संदर्भातील कामे देताना सक्षम अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानेच देण्यात यावीत, अशा मागणी मेलद्वारे करण्यात आल्याचे संघटनेचे राज्य प्रमुख संघटक भूपेश वाघ, जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, जिल्हा प्रमुख संघटक ऋषिकेश कापडे, कोषाध्यक्ष संजय जिरे, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, विभागीय सचिव रवींद्र देवरे, महिला अध्यक्षा दीपा मोरे, महिला सरचिटणीस प्रतिभा वाघ, कार्याध्यक्षा सुरेखा बोरसे, कोषाध्यक्षा रंजना राठोर, संघटक मिरा परोडवाड, उपाध्यक्षा संगीता ठाकरे, उपाध्यक्ष कैलाश सोनवणे, दिलीप वाडेकर, खुशाल चित्ते, मधुकर देवरे, कमलेश चव्हाण, शरद कानडे, विलास थोरात आदींनी कळविले आहे.

Web Title: 10% beds should be reserved for frontline workers in Kovid Hospital