शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

येत्या हंगामात १ लाख ७० हजार टन उसाचे गाळप होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळनेर : साक्री तालुक्यातील उत्पादीत होणारा ऊस हा नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पुरविण्यात येत असतो. यावेळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील उत्पादीत होणारा ऊस हा नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पुरविण्यात येत असतो. यावेळी साक्री तालुक्यातून १ लाख ७० हजार टन ऊसाचे गाळप येत्या हंगामात होणार असून, अंदाजे १९५० हेक्टर वरील ऊस गाळपसाठी तयार आहे,सध्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हतबल होऊन ऊस लागवड करीत आहे. यामुळेच यंदा नव्याने ४३५ हेक्टर ऊस लागवड झाली आहे.साक्री तालुक्यात पिंपळनेर, दहीवेल, कासारे व साक्री अशी मंडळे असून यंदा प्रत्येक मंडळातून गाळपासाठी ऊस उचलण्यात येणार आहे. यात पिंपळनेर मंडळातून ६०,०००, दहिवेल मंडळातून २०,००० टन, कासारे मंडळात ४०,००० टन, साक्री मंडळातून ४१,००० टन इतका ऊस गाळप होणार आहे म्हणजे एकूण १ लाख६१ हजार टन उसाचे गाळप होणार आहे.पिंपळनेर परिसरातील ऊस नाशिक जिल्ह्यातील कारखान्यांना पुरविला जातो. यात प्रमुख द्वारकाधीश साखर कारखाना ताराहाबाद हा नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे समजते. शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा ऊस उत्पादनात समाधानकारक पैसा मिळत असल्याने तसेच शेतीत इतर नुकसान टाळण्यासाठी ऊस लागवडीवर भर असल्याचे दिसत आहे. पाणी खते देणे सोईस्कर होते, तर ठिबकवर ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे, तसेच भविष्यात साखर कारखान्यांना ऊस मिळावा यासाठी ऊस लागवडकरिता द्वारकाधीश साखर कारखानातर्फे ऊस बियाणे शेतकऱ्यांना दिले जात आहे.गेल्या वर्षी दोन हजार पाचशे रुपये या भावाने साखर उत्पादक कारखान्यांनी पेमेंट केले होते.