धुळ्यानजिक रिक्षा-टेम्पो अपघातात १ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 13:17 IST2018-09-09T13:16:35+5:302018-09-09T13:17:48+5:30
उडाणे रस्तावरील घटना : जखमींमध्ये चार मुलांचा समावेश

धुळ्यानजिक रिक्षा-टेम्पो अपघातात १ ठार
ठळक मुद्देतालुक्यातील उडाणे रस्त्यावर अपघातएकाचा जागाचा मृत्यू, चार मुले जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील उडाणे रस्त्यावर रिक्षा आणि टेम्पो यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात योगेश कमलाकर हाके याचा जागीच ठार झाला असून ४ मुलांचा समावेश आहे़ अपघाताची ही घटना रविवारी सकाळी झाली़ मयत आणि जखमींना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ या अपघाताची नोंद तालुका पोलीस स्टेशनला घेण्याचे काम सुरु आहे़