सोनगीरनजिक अपघातात १ जागी ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 12:08 IST2019-02-21T12:07:57+5:302019-02-21T12:08:50+5:30

टेम्पोला लक्झरीची मागून धडक : मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

1 killed in a car accident | सोनगीरनजिक अपघातात १ जागी ठार 

सोनगीरनजिक अपघातात १ जागी ठार 

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीरकडून धुळ्याकडे भाजी घेऊन जाणाºया टेम्पोला लक्झरीने मागून धडक दिली़ अपघाताची ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली़ या अपघातात साहेबराव माळी या शेतकºयाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे़ तर अन्य तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ 

Web Title: 1 killed in a car accident