९ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:50 IST2019-11-16T22:49:08+5:302019-11-16T22:50:46+5:30
नेमबाजी : भोपाळ येथील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्र ठरला अव्वल

९ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य पदक
धुळे : भोपाळ येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ९ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य अशा एकूण १४ पदकांसह अव्वल स्थान पटकाविले़ स्पर्धेच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात १४ वर्षाच्या मुलींच्या संघाने व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने सर्वोत्कृष्ट विजेतेपद पटकविले़
स्पर्धेच्या १४ आणि १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या ओपन साईट, पीप साईट, एअर रायफल, एअर पिस्टल अशा प्रकारात यश मिळविणाºया खेळाडूंमध्ये वैयक्तिक पदक विजेत्यात सर्वेश देशमुख (रौप्य), अथर्व शिंदे (सुवर्ण), तेजल वसावे (रौप्य), मयुरी पवार (सुवर्ण), विराज पाटील (कांस्य), समर्थ मंडलिक (सुवर्ण)़ सांघिक विजेत्यांत १४ वर्ष वयोगटात सर्वेश देशमुख, मानस पाटील, आदित्य देशमुख, लावण्या गुप्ता, वेदांती भट, अल्फिया अत्तार, अथर्व शिंदे, रत्नेश कुंभार, अजीम सय्यद, तेजल वसावे, सानिका नाईक, मैत्री जाधव, मयुरी पवार, अंबिका काळोखे, ईशा टकसाळे़ १७ वयोगटात विराज पाटील, आर्यनसिंग ठाकूर, अथर्व मगर, के़डी़ वेनेल्ला, सृष्टी जाराड, अपूर्वा म्हात्रे, समर्थ मंडलिक, तेजस ढेरे, तन्मय कुंभार यांचा समावेश होता़
धुळ्यातून मानस पाटील
भोपाळ येथे झालेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात धुळ्यातून मानस पंकज पाटील याने सहभाग नोंदविला होता़ उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला़ त्याला कपिल बागुल आणि बिपीन सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले होते़ मानस हा धुळ्यातील यशवंत विनयेन मंदिर शाळेतील नववीचा विद्यार्थी आहे़