लाेहारातील ग्रामसेवकांचे काळ्या फिती लावून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST2021-08-18T04:38:56+5:302021-08-18T04:38:56+5:30
लोहारा : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले हे महिनाभराच्या रजेनंतर पुन्हा रुजू झाले आहेत. त्यांची बदली करण्यात यावी, ...

लाेहारातील ग्रामसेवकांचे काळ्या फिती लावून कामकाज
लोहारा : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले हे महिनाभराच्या रजेनंतर पुन्हा रुजू झाले आहेत. त्यांची बदली करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी संघटनेने असहकार आंदाेलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी ग्रामसेवकांनी काळ्या फिती लावून ग्रामपंचायतीचे कामकाज केले. त्यांच्या या आंदाेलनास सरपंचांनीही पाठिंबा दिला.
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले हे तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे पंचायत समिती कार्यालयात आल्यानंतर अपमानास्पद बाेलतात. वृक्षलागवड तसेच महामत्मा गांधी राेजगार हमी याेजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची अडवणूक करतात. वेळेवर मस्टर काढत नाहीत. त्यांच्या अशा स्वरूपाच्या कार्यपद्धतीमुळे गावपातळीवरील कामे खाेळंबली आहेत. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेने लावून धरली हाेती. त्यामुळे अकेले महिनाभराच्या दीर्घ रजेवर गेले हाेते. त्यांच्या चाैकशीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे. महिनाभराच्या रजेनंतर २ ऑगस्ट राेजी ते पुन्हा रुजू झाले. लागलीच १० ऑगस्टपासून संघटनेने असहकार आंदाेलन सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी काळ्या फिती लावून कामकाज केले.
चाैकट...
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन सुरू राहणार आहे. याच आंदाेलनाचा भाग म्हणून सर्व ग्रामपंचायतमध्ये काळ्या फिती लावून ग्रामसेवक व सरपंच यांनी कामकाज केले.
-एम.टी.जगताप, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन.