शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

सत्ता परिवर्तनाशिवाय स्वस्थ बसणार नाही; शरद पवार म्हणतात, मी अजून म्हातारा झालो नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 12:49 IST

आता विधानसभेलाही चांगली माणसे निवडून आली पाहिजेत. आम्हाला सत्ता सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हवी आहे.

परंडा (जि. धाराशिव) : देशात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही इंडियाच्या झेंड्याखाली एकत्र आलो आहोत. त्यामुळे बाबासाहेबांचे संविधान आपण सर्व जण वाचवू शकलो. अगदी तसेच महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. मी काही अजून म्हातारा झालो नाही, परिवर्तन घडवून आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही खा. शरद पवार यांनी रविवारी परंडा येथील सभेतून दिली.

परंडा मतदारसंघात यावेळी हाय व्होल्टेज लढत होत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याविरूद्ध शरद पवार गटाने पुन्हा एकदा माजी आ. राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी रविवारी स्वत: खा. शरद पवार परंड्याच्या मैदानात उतरले. येथील आठवडी बाजाराच्या मैदानावर झालेल्या सभेत खा. पवार म्हणाले, आपल्या राज्यात पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा केवळ १, तर आमचे ४ खासदार होते. यंदाच्या निवडणुकीत तुम्ही -आम्ही एकत्र आलो. तुम्ही आमचे ३१ खासदार निवडून दिले. आता विधानसभेलाही चांगली माणसे निवडून आली पाहिजेत. आम्हाला सत्ता सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हवी आहे. जे सध्या होताना दिसत नाही. मी संरक्षणमंत्री असताना पहिल्यांदा लष्करात महिलांना संधी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून दिले. आता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महालक्ष्मी योजनेतून ३ हजार रुपये दरमहा देणार आहोत. केंद्रात कृषिमंत्री असताना ऐतिहासिक अशी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती. आताही सत्तेत येताच शेतकरी कर्जमुक्त करणार आहोत. सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा आर्थिक मदत देऊन स्वावलंबी करणार आहोत. औषधी मोफत देण्याचा आमचा प्रयत्न असेल, त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आवश्यक असल्याचेही खा. पवार म्हणाले.

‘विकास, बिकास काय नाय...’अजित पवार व छगन भुजबळ यांनी अलीकडेच केलेल्या विधानांचा संदर्भ देत खा. पवार म्हणाले, पक्ष फोडून गेलेले आमचे लोक सुरुवातीला विकासासाठी गेलो म्हणत होते. आता स्वत:च सांगू लागले आहेत की, चौकशा मागे लागल्या होत्या म्हणून जावे लागले. त्यामुळे विकास, बिकास काय नाय. लोकांच्या लक्षात आले, तुम्ही का गेलात ते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारparanda-acपरांडा