शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मतचोर कुठे पळाले?; उद्धव ठाकरेंचा तुफानी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 17:43 IST

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या.

- बालाजी बिराजदारलोहारा (धाराशिव): 'सातबारा कोरा करतो' असे निवडणुकीपूर्वी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने आता शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. हे सरकार केवळ 'मतचोर' आणि 'दगाबाज' आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा पाटोदा चौरस्ता येथे जोरदार हल्लाबोल केला.

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी उपमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'टोमणे मारण्याशिवाय दुसरं काय येतं' या टीकेला रोखठोक उत्तर दिले. "शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, हे टोमणा आहे का? शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या, हे टोमणा आहे का? हा टोमणा नाही, पण टोला मात्र नक्कीच मारणार आहे," असे सांगत ठाकरे यांनी आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केला.

अजित पवारांना थेट आव्हानउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी 'तुमचा सातबारा कोरा केल्याशिवाय पवारांचा अवलाद सांगणार नाही' असे केलेले विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी आठवण करून दिली. "निवडणूक आली की लोकांच्या कोपऱ्याला गूळ लावतात. आता सत्तेत आल्यावर कर्जाचे पैसे भरा म्हणतात. मग आता कोणाची अवलाद लावणार?" असा थेट सवाल त्यांनी अजित पवारांना केला.

'कागदावर मदत, खिशात एक पैसा नाही!'उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, सरकारने जाहीर केलेली मदत केवळ कागदावर आहे, एकाही शेतकऱ्याच्या खिशात एक पैसाही गेलेला नाही. शेतकऱ्यांसाठी केलेली सर्व आश्वासने फसवी ठरली आहेत. ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले: "या दगाबाज सरकारला दगा दिलाच पाहिजे. जोपर्यंत आमचे कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत आम्ही महायुतीला मतदान करणार नाही, असे यांना ठणकावून सांगा."

याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार दिनकर माने, शामलताई वडणे, जिल्हा प्रवक्ते जगदिश पाटील, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना लाकडी नांगर भेट देण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Where did promise-breaking vote thieves flee?: Uddhav Thackeray's furious attack

Web Summary : Uddhav Thackeray slammed the government for neglecting farmers after promising loan waivers. He accused them of being 'vote thieves' and betrayers, demanding immediate relief and questioning unfulfilled promises made by Ajit Pawar regarding debt relief for farmers. He urged farmers to reject the current government if their debts aren't forgiven.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेdharashivधाराशिवRainपाऊसFarmerशेतकरी