दुकान बंद करून दागिने घेऊन जाताना सराफावर गोळीबार, भूम हादरले

By बाबुराव चव्हाण | Updated: December 30, 2023 16:59 IST2023-12-30T16:58:50+5:302023-12-30T16:59:24+5:30

घराकडे दुचाकीवर जाताना केला गोळीबार

While closing the shop and taking away the jewellery, Sarafa was shot, Bhoom shook | दुकान बंद करून दागिने घेऊन जाताना सराफावर गोळीबार, भूम हादरले

दुकान बंद करून दागिने घेऊन जाताना सराफावर गोळीबार, भूम हादरले

भूम (जि. : धाराशिव) : भूम शहरातील एका सराफावर दुकान बंद करून घराकडे जाताना गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली आहे. या घटनेत सराफ हे जखमी झाले आहेत.

भूम येथील सराफ व्यापारी विनायक हनुमंत दहिवाळ हे शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे आपले पालिका चौकातील दुकान बंद करून दागिने सोबत घेऊन घराकडे निघाले होते. ते दुचाकीवर असल्याने चार अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग सुरू केला. कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी गाठून विनायक यांच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र प्रतिकार केल्याने एकाने त्यांच्या दिशेने अंधारातच गोळीबार केला. यात एक काडतूस व्यापारी विनायक यांच्या पायात शिरले. गोंधळ पाहून लोक जमा होत असल्याने चोरट्यांनी तेथून दुचाकीवरून पोबारा केला. 

विनायक यांना सध्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वैद्यकीय अधिकारी एस. आर. खराडे यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती घेत तातडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया भूम ठाण्यात रात्री उशिरा सुरू होती.

Web Title: While closing the shop and taking away the jewellery, Sarafa was shot, Bhoom shook