कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST2021-07-31T04:33:24+5:302021-07-31T04:33:24+5:30
उस्मानाबाद : यंदा खरीप हंगामात पीक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पीक विमा ...

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का
उस्मानाबाद : यंदा खरीप हंगामात पीक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पीक विमा भरल्यानंतर मदत मिळविण्यासाठी लावण्यात येणारे निकष आडकाठी बनत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे. मदत मिळत नसले तर कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
गतवर्षी सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळण्याची आवश्यकता होती. परंतु बहुतांश जणांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना २३ जुलै २०२१ पर्यंत मुदत दिली होती. यापुढे सरकारच्या वतीने मुदत वाढविल्यास पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये प्रभावी जनजागृती होणे आवश्यक आहे.
३० टक्के शेतकऱ्यांची पाठ
गतवर्षी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला.
नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून पुरेशी भरपाई मिळाली नाही.
सतत हीच स्थिती असूनही मदत मिळत नाही. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नाही.
यंदा ७० टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला. ३० टक्के शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.
पॉईंटर..
जिल्ह्यातील एकूण शेतकरी
४५००००
पीकविमा काढलेले शेतकरी
गतवर्षी ९४८०००
यंदा ६६७०००
एकूण खरीप क्षेत्र ५१४०.९३
सोयाबीन ३६३१.२३
मूग १८९.०३
उडीद ४९५.१८
मका १०.७९
कापूस २९.९६
तूर ६०१.९१
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पिकाला विमा देण्याची तरतूद आहे. मात्र कंपन्याच्या जाचक अटीमुळे भरपाईची रक्कम फार कमी आहे. पीक लागवडीचा खर्च गेल्या दोन वर्षात प्रंचड वाढला आहे. त्यातल्या त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. गतवर्षी चार एकर क्षेत्रावरील तूर व सोयाबीनचा विमा काढला होता. पूर्ण पीक वाया गेले. विमा केवळ १६ हजार रुपये मिळाला. नुकसानीच्या प्रमाणात विम्याचा लाभ मिळावा.
बन्सी पवार, शेतकरी, किलज
गतवर्षी अडीच एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. या पिकाचा विमा भरला होता. पीक चांगले आले असतानाच काढणीच्या वेळी पाऊस आल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. केवळ १४ हजार रुपयांचा विमा मिळाला. गतवर्षीचा अनुभव वाईट आलेल्या आहे. यंदाही विमा काढला सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. कंपनीने नुकसान झालेल्या प्रमाणात भरपाई द्यावी.
राम रोकडे, शेतकरी, कुंभारी