'प्रसाद खाऊन झोपली होतीस तेव्हा..';क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत महाराजाकडून विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 13:37 IST2022-07-29T13:33:09+5:302022-07-29T13:37:02+5:30

बीड जिल्ह्यातील एक ३५ वर्षीय महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजांची भक्त होती.

'When you were sleeping after eating Prasad...'; Sexually Harassment by Maharaja threatening to make the sex clip viral | 'प्रसाद खाऊन झोपली होतीस तेव्हा..';क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत महाराजाकडून विनयभंग

'प्रसाद खाऊन झोपली होतीस तेव्हा..';क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत महाराजाकडून विनयभंग

कळंब (जि.उस्मानाबाद) : यापूर्वी ठेवलेल्या शरीरसंबंधांचा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका महाराजाने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी दुपारी मलकापूरच्या मठात घडली आहे. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन शुक्रवारी पहाटे आरोपी महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील एक ३५ वर्षीय महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजांची भक्त होती. २८ जुलै रोजी ती एकटीच मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली. गुरुवारची गर्दी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात होते. त्यांचे जेवण सुरु असल्याने ही महिला एका झाडाखालील ओट्यावर बसली. तेव्हा एकनाथ महाराजांच्या शिष्याने तिच्याजवळ येऊन महाराजांनी खोलीत बोलाविल्याचे सांगितले. आत गेल्यानंतर महाराजांनी शरीर संबंध ठेवावे लागतील, असे सांगितले. यास विरोध केल्यानंतर व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी महिलेचा विनयभंग केला. तेव्हा आरडाओरडा केल्यामुळे शिष्याने दार उघडले. यावेळी मारहाण करुन गळा दाबण्याचा प्रयत्नही महाराजाने केल्याची तक्रार महिलेने येरमाळा पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एकनाथ महाराजावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

म्हणे, पेढा दिला खायला अन्...
दर्शनासाठी खोलीत गेल्यानंतर एकनाथ महाराजांनी या महिलेस शरीरसंबंधाची विचारणा केली. त्यास नकार दिल्यानंतर महाराजांनी मागच्या वेळी पेढा खायला दिल्यानंतर तु झोपली होती, तेव्हा आपण तुझ्यावर बलात्कार केला व त्याचा व्हीडिओही तयार केल्याचे सांगितले. हाच व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी महाराजाने दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: 'When you were sleeping after eating Prasad...'; Sexually Harassment by Maharaja threatening to make the sex clip viral