‘आई राजा उदे-उदे’च्या जयघाेषात निघाली जलयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:20 IST2021-02-05T08:20:14+5:302021-02-05T08:20:14+5:30

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) - ‘आई राजा उदे-उदे’च्या जयघाेषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात शाकंभरी नवरात्रातील सुवासिनींची जलयात्रा साेमवारी अत्यंत साधेपणे ...

The voyage started with the triumph of 'I Raja Ude-Ude' | ‘आई राजा उदे-उदे’च्या जयघाेषात निघाली जलयात्रा

‘आई राजा उदे-उदे’च्या जयघाेषात निघाली जलयात्रा

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) - ‘आई राजा उदे-उदे’च्या जयघाेषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात शाकंभरी नवरात्रातील सुवासिनींची जलयात्रा साेमवारी अत्यंत साधेपणे काढण्यात आली. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जलयात्रेत निवडक महिलाच सहभागी झाल्या हाेत्या. सोमवारी सकाळी यजमान राजेश ऊर्फ बळवंत कदम व त्यांच्या पत्नी मनोजा कदम यांच्या हस्ते पापनास येथील इंद्रायणी देवीची पंचामृत अभिषेक पूजा करण्यात आली. यानंतर अलंकार पूजा होऊन तहसीलदार सौदागर तांदळे व धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांनी शासकीय आरती केली. तसेच यजमान कदम दाम्पत्य यांच्या हस्तेही इंद्रायणी देवीची आरती करण्यात आली. या आरतीनंतर पापनास तीर्थकुंडात ठेवण्यात आलेला चांदीचा कलश व इतर जलकलशांची यजमान कदम दाम्पत्य व व्यवस्थापक तहसीलदार, धार्मिक व्यवस्थापक यांनी पूजन करून जलयात्रेस प्रारंभ केला. पूजन केलेला चांदीचा कलश सजवलेल्या रथामध्ये ठेवण्यात आला तर पारंपरिक वाद्य असलेला नगरा बैलगाडीमध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर पारंपरिक वाद्याच्या व तुळजाभवानी शाकंभरी मातेच्या जयघोषात जलयात्रा मंदिराकडे निघाली. दरम्यान, यजमान कदम दाम्पत्याने राणी लक्ष्मीबाई उद्यानातील छत्रपती संभाजीराजे व क्रांती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केला. यानंतर यात्रा मंदिराकडे रवाना झाली. जलयात्रा मंदिरात आल्यावर यजमान कदम दाम्पत्याने होमकुंडावर जाऊन जल अर्पण करून पूजन केले. तसेच चांदीचा कलश श्री तुळजाभवानीच्या चरणी लावून जल अर्पण करण्यात आले. सुवासिनींनी आणलेल्या कलशातील जल देवीच्या चरणी अर्पण करण्यात आले. यानंतर सुवासिनींची ओटी खणा-नारळाने भरण्यात आली. याविधीनंतर भोपे पुजारी बांधवांनी श्री तुळजाभवानीची शेषशाही अवतारातील अलंकार महापूजा मांडली. यजमान राजाभाऊ व मनोजा कदम यांनी शाकंभरी देवीचे पूजन करून आरती करून घटास पाचवी माळ घातली. यानंतर सवाद्य तुळजाभवानीस यजमानांच्या हस्ते नैवेद्य दाखविण्यात आला.

जलयात्रेत महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, भोपे अध्यक्ष अमर परमेश्वर, संजय सोंजी, शासकीय उपाध्ये बंडुपंत पाठक, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, त्यांचे पदाधिकारी तसेच पाळीकर पुजारी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, उपाध्य मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी, गोंधळी, आराधी, कुमारिका, मंदिर कर्मचारी उपस्थित होते.

250121\25osm_1_25012021_41.jpg

शाकंभरी नवरात्राैत्सवानिमित्त साेमवारी तुळजापूर शहरातून सुवासिनींची जलयात्रा काढण्यात आली.

Web Title: The voyage started with the triumph of 'I Raja Ude-Ude'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.