महाविद्यालयास विविध ग्रंथ भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST2021-01-14T04:26:56+5:302021-01-14T04:26:56+5:30
सुरक्षित अंतर राखून घेतले महाराजांचे दर्शन काजळा : येथील शेतकऱ्यांनी दर्श वेळ अमावास्या हा सण उत्साहात साजरा केला. काजळा ...

महाविद्यालयास विविध ग्रंथ भेट
सुरक्षित अंतर राखून घेतले महाराजांचे दर्शन
काजळा : येथील शेतकऱ्यांनी दर्श वेळ अमावास्या हा सण उत्साहात साजरा केला. काजळा गावात श्री सद्गुरू रामानंद महाराज देवस्थान येथे दरवर्षी वेळामावस्येदिवशी मोठी यात्रा भरते. यासाठी परिसरातील अनेक गावातील भाविक महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुरक्षित अंतर राखत दर्शन घेतले.
चोरीच्या मोबाईलसह संशयित ताब्यात
उस्मानाबाद : तालुक्यातील वरूडा येथील संतोष सातपुते हे ५ जानेवारी रोजी उस्मानाबाद ते वरूडा असा बस प्रवास करीत असताना त्यांचा भ्रमणध्वनी चोरीस गेला होता. याप्रकरणी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायब पोलीस ठाण्याच्या मदतीने याचा तपास करून वरूडा येथील अविनिश कमलाकर रोटे यास त्याच्या राहत्या घरातून मोबाईलसह ताब्यात घेतले. ही कारवाई ११ जानेवारी रोजी करण्यात आली. पुढील तपासकामी त्यास उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
एकावर कारवाई
उस्मानाबाद : येथील आननद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ११ जानेवारी रोजी शिंगोली येथे छापा टाकला. यावेळी वरूडा येथील रमेश धोत्रे व शिंगोली येथील दत्ता रणदिवे हे ११ शिंगोली येथील पानटपरी जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह मिळून आले.