भाई उद्धवराव पाटील प्रशालेत विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:27 IST2021-01-14T04:27:05+5:302021-01-14T04:27:05+5:30

उस्मानाबाद : शहरातील भाई उद्धवराव पाटील शाळेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष मनिषा पाटील यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. ...

Various programs at Bhai Uddhavrao Patil School | भाई उद्धवराव पाटील प्रशालेत विविध कार्यक्रम

भाई उद्धवराव पाटील प्रशालेत विविध कार्यक्रम

उस्मानाबाद : शहरातील भाई उद्धवराव पाटील शाळेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष मनिषा पाटील यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नववी आणि दहावीच्या विद्यार्थीनी जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची वेषभूषा परिधान केली होती.

प्रतिमा पूजनानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत मुलींची प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर उपस्थित युवतींना एक आदर्श महाराष्ट्र घडविण्याचे काम हे जिजाऊंची मुले म्हणून आम्ही आपली जबाबदारी पार पाडू, अशी शपथ देण्यात आली. यावेळेस राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्ष मनिषा पाटील, मुख्याध्यापिका शुभांगी नलावडे, शिक्षिका अंजली जाधव, राजनंदिनी जाधव, मंजुषा खळदकर, राणी रोहिदास, रेणुका पाटील उपस्थित होत्या.

यानंतर सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे क्रमांक काढण्यात आले. यात गाैरी पवार (प्रथम), शिवाजी सुरवसे (द्वितीय), विधी बन (तृतीय) क्रमांक पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

Web Title: Various programs at Bhai Uddhavrao Patil School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.