उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; बोरी शिवारात वीज कोसळून शेतकरी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 19:14 IST2025-04-25T19:13:37+5:302025-04-25T19:14:20+5:30
वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसाराेपयाेगी साहित्याचे नुकसान झाले.

उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; बोरी शिवारात वीज कोसळून शेतकरी ठार
उमरगा (जि. धाराशिव) : तालुक्यासह नारंगवाडी मंडळातील अनेक गावांत शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसादरम्यान बाेरी शिवारात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर एकुरगा शिवारात वीज पडून बैल दगावला.
उमरगा शहरासह तुरोरी, मुळज, तलमोड, कोळसूर, कोरेगाव, एकोडी, गुंजोटी, जकेकूर आदी भागांत सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू असतानाच बाेरी शिवारात वीज काेसळून शेतकरी अमाेल संतराम मदने यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच एकुरगा शिवारातही वीज पडून बैल दगावला. पेठसांगवी शिवारातही वीज काेसळून वासरू दगावले.
दरम्यान, नारंगवाडी, नाईचाकूर, बोरी, माडज, एकुरगा, बेटजवळगा शिवारातील फळबागांसह ज्वारी, कांदा यासारख्या पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसाराेपयाेगी साहित्याचे नुकसान झाले. नुकसानीची माहिती घेण्यात येत असल्याचे तहसीलदार गाेविंद येरमे यांनी सांगितले.