तुळजापुरात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून रोख रकमेसह मुद्देमाल केला लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 19:11 IST2019-01-12T19:10:40+5:302019-01-12T19:11:05+5:30

नळदुर्ग रोडलगत असलेल्या कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने फोडून अज्ञातांनी रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केला.

In Tuljapur, thieves broke into three shops and looted them with cash | तुळजापुरात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून रोख रकमेसह मुद्देमाल केला लंपास

तुळजापुरात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून रोख रकमेसह मुद्देमाल केला लंपास

उस्मानाबाद : तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडलगत असलेल्या कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने फोडून अज्ञातांनी रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर शहरात सचिन पाटील यांचे कॉम्प्लेक्स आहे. या ठिकाणी शिवप्रकाश कॉलनीत वास्तव्यास असलेले संकेत रामचंद्र गर्क यांचे किराणा दुकान आहे. गुरूवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले असता, अज्ञातांनी दुकान फोडून गल्ल्यातील सुमारे चार हजार रूपये लंपास केले.

यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा तुळजाई टायर दुकानाकडे वळविला. दुकानाचे शटर उचकटून सतराशे रूपये किंमतीचे टायर चोरून नेले. तसेच बाजुलास असलेले क्षितीज मेडिकलही फोडले. गल्ल्यातील रोख सातशे रूपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान, उपरोक्त दुकानदार नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी आपली दुकाने उघडण्यासाठी आले असता, चोरी झाल्याचे समोर आले.

या प्रकरणी संकेत गर्ग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध ११ डिसेंबर रोजी तुळापूर ठाण्यात भादंविचे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: In Tuljapur, thieves broke into three shops and looted them with cash