तुळजापुरात स्वातंत्र्यदिन साधेपणाने उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST2021-08-17T04:37:45+5:302021-08-17T04:37:45+5:30
येथील श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन कार्यालय व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषदेत नगराध्यक्ष सचिन ...

तुळजापुरात स्वातंत्र्यदिन साधेपणाने उत्साहात साजरा
येथील श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन कार्यालय व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषदेत नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते भारत माता व महात्मा गांधी प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण पार पडले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, नगरसेवक, न. प. कर्मचारी आदीसह शहरातील नागरिक उपस्थित होते. तहसील कार्यालयात तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी लोकप्रतिनिधींसह नागरिक उपस्थित होते. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्राचार्य डॉ. एन. डी. पेरगाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य रवी मुदकन्ना, प्रबंधिका सुजाता कोळी, विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.