शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी मंदिरात नोंदीपेक्षा सोने-चांदी, हिरे निघाले जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 06:57 IST

गडबडीला वाव असल्याचा समितीचा निष्कर्ष ; तुळजाभवानी मंदिरातील मौल्यवान वस्तूंची मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्क  धाराशिव : तुळजाभवानी देवीला भाविकांनी वाहिलेल्या मौल्यवान वस्तूंची मोजणी नुकतीच पूर्ण झाली आहे. यासाठी गठित समितीने दिलेल्या अहवालात सोने-चांदी मंदिराकडे असलेल्या नोंदीपेक्षा जास्तीचे आढळले आहे. यामुळे गडबडीला वाव असून, तब्बल ३५४ हिऱ्यांचीही नोंद निदर्शनास आली नसल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. 

श्री तुळजाभवानी देवीला भाविकांनी श्रद्धेपोटी अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांची मोजणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी एक समिती गठित केली होती. जवळपास महिनाभर चाललेल्या या मोजणीनंतर समितीने आपला अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार मंदिराकडे वाहिक सोन्यांच्या वस्तू, दागिन्यांचे वजन २४४ किलो ४४५ ग्रॅम इतके भरले आहे. 

मंदिराकडे असलेल्या नोंदीपेक्षा हे वजन ७५६ ग्रॅम जास्त आहे. मोजणीअंती चांदीचे वजन हे ३९०८ किलो ३६८ ग्रॅम भरले आहे. यातही तफावत असून, नोंदीपेक्षा १७ किलो ८३ ग्रॅम वजन जास्तीचे आहे. तफावत आढळलेल्या वजनाच्या वस्तूंची नोंद का घेण्यात आली नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दुर्मीळ नाणीही नाहीत...    मोजणी समितीने पुरातन, शिवकालीन सुमारे ११ दागिने आढळून येत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याऐवजी इतर नोंद नसलेले १३ दागिने सापडले आहेत.  दुर्मीळ नाणीही गायब झाल्याने तुळजापूर ठाण्यात याविषयी सुमारे तीन-साडेतीन वर्षांपूर्वी गुन्हाही दाखल झाला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. 

डबी सापडली पण नोंद कुठे?  समितीला मौल्यवान वस्तूंची मोजणी करताना खजिना खोलीतील एका पेटीत डबी सापडली. त्यात १९ कॅरेटचे ३५४ हिरे आढळून आले. मात्र त्याची मंदिराकडे असलेली अधिकृत नोंद निदर्शनास आणून देण्यात आली नाही. 

‘अलंकार गायब प्रकरण जुनेच’  अलंकार गायब असल्याचे प्रकरण जुनेच आहे. यात एक गुन्हाही दाखल झाला आहे. तरीही समितीला १९६३ ची देवीच्या अलंकारांची नोंद यादी पुरवून पुन्हा एकदा पडताळणी करून अहवाल देण्यास सांगितले आहे. यात तफावत आढळल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले.

टॅग्स :tuljapur-acतुळजापूरGoldसोनंMONEYपैसा