शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा; कलेक्टर, पोलिस अधीक्षक हाजिर हो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 14:20 IST

अवमान याचिकेवर सुनावणी; उच्च न्यायालयाचा आदेश

धाराशिव : तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी लिलावात साडेआठ कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर ३ महिने उलटत असतानाही गुन्हा दाखल झाला नाही. हिंदू जनजागृती समितीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी घेताना औरंगाबाद खंडपीठाने धाराशिव जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना २ सप्टेंबरला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. १९९१ ते २००९ या कालावधीत तुळजाभवानी मंदिरातील दानपेट्यांचा लिलाव करण्यात आला होता. लिलाव घेणाऱ्यांचे हितसंबंध जोपासणारे निकष लावून याद्वारे ८ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. 

मुख्य सचिवांनाही नोटीस तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी लिलाव घोटाळ्याच्या या प्रकरणात सध्या गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार पाहत असलेल्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनाही खंडपीठाने अवमाननेची नोटीस बजावली आहे. 

सीआयडी चौकशी लावली-  २०११ साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकाराची सीआयडी चौकशी लावली होती. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. -  यामुळे हिंदू जनजागृती समितीने २०१५ साली अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. तिचा अंतिम निकाल ९ मे २०२४ रोजी देण्यात आला. या घोटाळ्यात सहभागी सर्व दोषींवर विनाविलंब गुन्हा दाखल करण्याचा आदेश खंडपीठाने दिला होता. -  मात्र, दोन महिने उलटल्यानंतरही गुन्हे दाखल होत नसल्याने समितीने अवमान याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी सुनावणी घेऊन धाराशिवच्या जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना २ सप्टेंबरला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश दिला असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट, तसेच तुळजापूरचे किशोर गंगणे यांनी दिली. 

म्हणून गुन्ह्यात विलंब नको...सध्या न्यायालयात अवमान याचिकेवर सुनावणी सुरू असल्याचे कारण सांगत घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंदवण्याचे काम थांबवण्याची आवश्यकता नाही, अशी सूचनाही खंडपीठाने केली आहे.

टॅग्स :TempleमंदिरCorruptionभ्रष्टाचारCourtन्यायालय