मंदिर परिसरात थुंकले, ८ पुजाऱ्यांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:05 IST2025-06-13T10:04:28+5:302025-06-13T10:05:10+5:30

Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना बुधवारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.

Tuljabhavani Mandir: Spitting in temple premises, notices issued to 8 priests | मंदिर परिसरात थुंकले, ८ पुजाऱ्यांना नोटिसा

मंदिर परिसरात थुंकले, ८ पुजाऱ्यांना नोटिसा

तुळजापूर (जि. धाराशिव) - तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना बुधवारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. तीन महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदीची शक्यता आहे.   

संबंधित पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचे सीसीटीव्हीमध्ये  आढळले.  यामुळे मंदिर प्रशासनाने दखल घेत, देऊळ कवायत कलम २४ व २५ अन्वये संबंधितांना नोटीस बजावली. मंदिर प्रशासनाने नोटीसमध्ये स्पष्ट केले की, पुजारी व्यवसायास असे वर्तन शोभणारे नसून, मंदिर परिसरातील पावित्र्याला बाधा पोहोचविणारे आहे. 
 

Web Title: Tuljabhavani Mandir: Spitting in temple premises, notices issued to 8 priests