शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

कार्यकर्त्यांचा सूर, सेनेला ठेवा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने मांडत आहे. या पार्श्वभूमीवर ...

उस्मानाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने मांडत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी उस्मानाबादेत झालेल्या परिवार संवादात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेला दूर ठेवून स्वबळावर लढण्याचा सूर आळवला. तसेच ते गटातटावरही बरसले. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अत्यंत संयमी शब्दात समजूत काढत मार्ग काढण्याचा शब्द दिला.

उस्मानाबाद येथे उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीशी संवाद साधला. यावेळी मंचावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, आ. विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जीवनराव गोरे, डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संवादाची सुरुवातच पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यापासून करण्यात आली. एका पदाधिकाऱ्याने शिवसेनेशी जुळवून घेणे कठीण असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी किंमत देत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर दुसऱ्यानेही तोच सूर आळवला. उलट शिवसेना राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थेच्या कामात बाधा आणत असल्याची तक्रार केली. आतापर्यंत शिवसेनेलाच विरोध केला. आता त्यांच्याशी कसे जुळवून घ्यायचे, असा सवालही त्या पदाधिकाऱ्याने केला. अधिकारी आपली कोणतीच कामे ऐकत नाहीत, अशी तक्रार काही पदाधिकाऱ्यांनी केली. खासदार, आमदारांच्या शिफारशी आणायला सांगतात, असे सांगताच जयंत पाटील यांनी कोणती कामे, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर सावरून त्या पदाधिकाऱ्याने सर्वसामान्यांच्या काही कामांची उदाहरणे दिली. पाटील यांनी कोण कामे ऐकत नाहीत, त्यांची नावे द्या, आपण स्वत: त्यांच्याशी बोलू, असे सांगून समाधान केले.

आम्हाला काही किंमत आहे का...

कोणत्याही पक्षातील गटतट, भांडणे ही राजकारणात सजीवपणाची लक्षणे समजली जातात. तोच प्रकार येथे पाहायला मिळाला. अनेक पदाधिकाऱ्यांनी गटातटावर तळमळीने भाष्य केले. पक्षाच्या बैठका कळविल्या जात नाहीत. फोटोत काही मोजकेच चेहरे दिसतात. ज्येष्ठांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत, त्यामुळे मग आम्ही नेमके जायचे कोणाकडे, अशा स्वरुपाच्या या तक्रारी होत्या. त्यावरही जयंत पाटील यांनी संयतपणे उत्तरे दिली.

राणादादांनी नुकसान केले...

राणादादा हे पक्षाची धोरणे ठरवीत होते, आता त्यांना तिकडे धोरणे कळविली जात आहेत. त्यांचे स्वत:चे नुकसान झाले अन् आपलेही, असे स्पष्टपणे सांगतानाच उपस्थित असलेल्या सर्व निष्ठावंत होतात म्हणून आपण येथे थांबला आहात. तुमची कुचंबणा होऊ देणार नाही. ज्यांचे गट आहेत, त्या सर्वांना रात्रीच बोलावून घेत आजच समेट घडवून आणतो. तुम्ही सर्वजण चांगले काम करणारे आहात. हे गटतट विसरून एकदिलाने मिळून काम करू, असे सांगत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न या संवादाच्या अखेरीस केला.