तुमच्या वाहनांवर हजारोंचा दंड तर नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST2021-08-26T04:34:28+5:302021-08-26T04:34:28+5:30
सद्य:स्थितीत प्रत्येक वाहतूक पोलिसांच्या हातात ई-चालानकरिता मोबाइल देण्यात आला आहे. या मोबाइलमधील ॲपवर संबंधित वाहनाच्या क्रमाकांचे छायाचित्र काढताच त्या ...

तुमच्या वाहनांवर हजारोंचा दंड तर नाही ना?
सद्य:स्थितीत प्रत्येक वाहतूक पोलिसांच्या हातात ई-चालानकरिता मोबाइल देण्यात आला आहे. या मोबाइलमधील ॲपवर संबंधित वाहनाच्या क्रमाकांचे छायाचित्र काढताच त्या वाहन चालकाच्या मोबाइलवर दंडाचा एसएमएस जातो. परंतु, अनेक लोक आपले वारंवार मोबाइल क्रमांक वारंवार बदलत असल्याने त्यामुळे त्या वाहनचालकाला आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आणि आपल्याला दंड ठोठावण्यात आला हे देखील माहीत नसते. त्या वाहनावर हजारो रुपयांचा दंड जमा होऊन जातो. त्यामुळे त्या दंडाची वसुली कशी करायची हा प्रश्न पोलिसांसमोर असतो.
कसे फाडले जाते ई-चालान
जिल्हा वाहतूक शाखेकडे ई-चालनाकरिता ॲप देण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचारी आपल्या मोबाइलमध्ये ते ॲप, डाऊनलोड करतात. रस्त्यावर ड्यूटी करताना ज्या वाहनचालकांकडून नियम तोडले जातात. त्या वाहनाचे छायाचित्र काढून दंडाचा एसएमएस त्या वाहनचालकांच्या मोबाइलवर पाठविला जातो. त्यामुळे वाहनचालकांची गोची होत आहे.
ई-चालानच्या मेसेजमध्ये संबंधित वाहन चालकाने नो पार्किंग, भरधाव वेगात गाडी चालविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, ट्रीपल सीट अशा नियमांचा भंग केला हे त्यात नमूद केले जाते. दंडाची रक्कम किती हे सुद्धा त्या मेसेजमध्ये सांगण्यात येते. केलेला दंड वाहनचालक कुठेही भरू शकतात.
दंडाची थकबाकी वाढली
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलीस विभागाकडून संबंधित चालकाला ई-चालान देण्यात येते.
हे चालान वाहनधारकांच्या मोबाइलवर जात असल्याने अनेक वाहनचालक दंडाची रक्कम भरण्याकडे टाळाटाळ करतात.
याचाच परिणाम मागील अडीच वर्षात अडीच कोटी रुपयांचा दंड थकलेला असल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाकडून मिळाली.
कोट....
३० टक्के दंड वसूल
वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर २०१९ पासून ई-चालनाद्वारे दंड वसूल करण्यात येत आहे. मागील अडीच वर्षाच्या कालावधीत १ लाख ८१ हजार ९९३ व्यक्तींवर कारवाई करून ४ कोटी ४ लाख ५७ हजार १०० रुपयांचा दंड केला आहे. यातील ३० टक्के दंड वसूल झालेला आहे. मोबाइल क्रमांक बदलल्यानंतर वाहनचालकांना संदेश प्राप्त होत नाही. मात्र, दंड भरावाच लागतो. ज्या वाहनधारकांनी दंड भरला नाही. त्यांनी दंड भरावा.
इक्बाल सय्यद, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा