उस्मानाबादेत स्वाईन फ्ल्यूचा तिसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 17:30 IST2018-09-25T17:29:34+5:302018-09-25T17:30:34+5:30

मागच्या १० दिवसांत या आजाराने दोन महिलांचा बळी घेतलेला आहे.

The third victim of swine flu in Usmanabad died | उस्मानाबादेत स्वाईन फ्ल्यूचा तिसरा बळी

उस्मानाबादेत स्वाईन फ्ल्यूचा तिसरा बळी

उस्मानाबाद : जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग वेगाने पसरत चालला आहे़ मागच्या १० दिवसांत या आजाराने दोन महिलांचा बळी घेतलेला आहे. आज लोहारा तालुक्यातील जेवळी येथील एका महिलेचा याने मृत्यू झाला़

जेवळी येथील एक ६० वर्षीय महिला पंधरा दिवसांपूर्वी ताप, सर्दी, खोकल्याने त्रस्त झाली होती़ या महिलेस १० सप्टेंबर रोजी उमरगा येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, त्यांच्यात स्वाईन फ्ल्यूची लक्षणे दिसून आल्याने १३ सप्टेंबर रोजी पुणे येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ याठिकाणी उपचार सुरु असताना २५ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने लक्ष देऊन जेवळी गावात तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ दरम्यान, स्वाईन फ्ल्यूने आजवर जिल्ह्यात तीन महिलांचा बळी घेतला आहे़ उमरगा तालुक्यातील कोळसूर, लोहारा तालुक्यातील जेवळी व तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथील एक, अशा तीन महिला या संसर्गाने मृत्यूमुखी पडल्या आहेत़

Web Title: The third victim of swine flu in Usmanabad died