भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळली; अभियंत्यासह दाेघे ठार
By बाबुराव चव्हाण | Updated: July 20, 2023 16:22 IST2023-07-20T16:21:50+5:302023-07-20T16:22:14+5:30
साेलापूर-छत्रपती संभाजीनगर हायवेवरील दुर्घटना

भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळली; अभियंत्यासह दाेघे ठार
धाराशिव - भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात अभियंत्यासह दाेघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास साेलापूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बावी शिवारातील आश्रम शाळेजवळ घडली.
केशेगाव येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे ईडीपी मॅनेजर संताेष दत्तू पाटील (केशेगाव), अभियंता श्रीकांत गिरीधर जाधव (रा. दारफळ) हे दाेघेजण कारमधून धाराशिवकडे येत हाेते. त्याची कार साेलापूर ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बावी आश्रम शाळेनजीक आली असता, नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जावून आदळली. या भीषण अपघातात दाेघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कार झाडावर आदळल्याबराेबर दाेन्ही एअर बॅग उघडून फुटल्या. घटनेची माहिती मिळाताच केशेगाव तसेच दारफळ या दाेन्ही गावांवर शाेककळा पसरली आहे.