भूम (जि. धाराशिव): शहरातील प्रशासकीय कामकाजात सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे आणि प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संतप्त झालेल्या १४ नगरसेवकांनी आज भूम नगरपालिकेत एक अनोखे आंदोलन केले. जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रभारी मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीचा 'बेशरम'च्या झाडाने सत्कार करत प्रशासनाच्या उदासीनतेवर जोरदार प्रहार केला.
काय आहे नेमके प्रकरण?नगरपरिषदेचे कायमस्वरूपी मुख्याधिकारी वैद्यकीय रजेवर गेल्याने हे पद रिक्त झाले होते. सध्या या पदाचा अतिरिक्त पदभार तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही प्रभारी मुख्याधिकारी पालिकेत नियमित उपस्थित राहत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे. आठवड्यातून किमान दोन दिवस तरी पालिकेत पूर्णवेळ उपस्थित राहावे, ही मागणी प्रशासनाने वारंवार डावलल्याने नगरसेवकांचा संयम सुटला.
प्रलंबित कामांमुळे नागरिक हैराणमुख्याधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने नागरिकांच्या विविध कामांच्या फाईल्स प्रलंबित आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. "आम्ही वारंवार विनंती करूनही प्रशासन लक्ष देत नाही, त्यामुळे आम्हाला हा उपरोधिक मार्ग स्वीकारावा लागला," असे नगरसेवकांनी सांगितले. जनशक्ती आघाडीचे गटनेते रुपेश शेंडगे यांनी इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने तातडीने सुधारणा केली नाही, तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.
Web Summary : Frustrated by administrative delays and the absence of the Chief Officer, councilors in Bhum protested by presenting a 'shameless' plant to the empty chair. Pending work and citizen complaints fueled the unusual demonstration, warning of intensified action if issues persist.
Web Summary : भूम में प्रशासनिक देरी और मुख्य अधिकारी की अनुपस्थिति से परेशान पार्षदों ने खाली कुर्सी को 'बेशर्म' का पौधा भेंट कर विरोध जताया। लंबित कार्य और नागरिक शिकायतों ने इस प्रदर्शन को बढ़ावा दिया, और मुद्दों के बने रहने पर तीव्र कार्रवाई की चेतावनी दी।