भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; रामपुरे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

By राजकुमार जोंधळे | Updated: February 17, 2025 23:19 IST2025-02-17T23:16:02+5:302025-02-17T23:19:40+5:30

उमरगा-लातूर मार्गावरील माडज येथे झाला पीकअप व दुचाकीची जोरदार अपघात; एकूण तिघे ठार, दोन जखमी

Terrible accident at Madaj on Umarga-Latur road; Pickup-two-wheeler collision, two real brothers died | भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; रामपुरे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; रामपुरे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

उमरगा (जि. धाराशिव) : उमरगा - लातूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून, सोमवारी सायंकाळी पीकअप व दुचाकीची जोरदार धडक बसल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास माडज पाटीजवळील अमराई समोर हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार औसा तालुक्यातील मंगळूर येथील दीपक वसंत रामपूरे (वय २७) व आकाश सूर्यकांत रामपुरे (वय २५) हे दोघे सख्खे चुलत भाऊ सोमवारी कामानिमित्त उमरगा शहरात आले होते. दरम्यान, काम आटोपून ते दुचाकीवरून (एम.एच. ५ ए.एन. ०५५४) ते गावाकडे परत जाताना माडज पाटीनजीक ट्रकने पिकअपला (एम.एच. २५ पी. ३४०८) ठोकरल्याने तो दुचाकीवर जावून धडकला. या अपघातामध्ये दीपक रामपुरे आणि आकाश रामपुरे या सख्या चुलत भावांसह पिकअपमध्ये चालकाच्या बाजुला बसलेले येळी (ता. उमरगा) येथील दिंगबर गिरजप्पा कांबळे (५७) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर पिकअप चालक संतोष स्वामी आणि मारुती रेड्डी (रा. दोघेही येळी, ता. उमरगा) हे जखमी झाले आहेत.

अपघात झाल्यानंतर तिघेही रस्त्यावर पडलेले हाेते. यावेळी महामार्गावरुन जाणारे एकही वाहन थांबत नव्हते. याचवेळी माडज येथील वैजिनाथ उर्फ नाना काळे यांनी पळसगांव (ता. उमरगा) येथील अजय कदम यांची उमरग्याकडे निघालेल्या पीक जीप थांबवली. या दोघांनी तिघांनाही प्रथम खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Terrible accident at Madaj on Umarga-Latur road; Pickup-two-wheeler collision, two real brothers died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.