स्वयंपाकाची चव महागली ; मसाला दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST2021-08-20T04:37:18+5:302021-08-20T04:37:18+5:30
दोन वर्षापासून कोरोनामुळे कुणाची नोकरी गेली तर कोणाचा व्यवसाय कोडमडला अशा परिस्थितीत कोरोनाशी दोन हात करत सर्वसामान्यांना महागाई जगू ...

स्वयंपाकाची चव महागली ; मसाला दरात वाढ
दोन वर्षापासून कोरोनामुळे कुणाची नोकरी गेली तर कोणाचा व्यवसाय कोडमडला अशा परिस्थितीत कोरोनाशी दोन हात करत सर्वसामान्यांना महागाई जगू देत नसल्याचे चित्र आहे. एक तर हाताला काम नाही, त्यात महागाई. अशा परिस्थितीत कुटूंबाचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न सर्वसामान्य कुटूंबासमोर आहे. गेले चार ते पाच महिन्यांपासून पेट्रोल - डिझेलचे दर वाढत चालले असून, दर महिन्याला गॅसची देखील दरवाढ होत आहे. यासोबत दोन हात करत असताना खाद्यतेलाचीही भर या दरवाढीत पडली आहे. शिवाय, प्रत्येक कुटूंंबाला स्वयंपाकासाठी लागणाऱ्या मसाले पदार्थाचे भावही वाढत चालले आहेत. त्यात श्रावण महिना हा सणासुदीचा महिना असून, याच महिन्यात जीवनावश्यक वस्तूंचे दर वधारत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
# महागाई पाठ सोडेना !
गॅस, खाद्यतेलाचे भाव वाढत चालले असतानाच आता मसाल्याचे दर वाढ आहेत. यामुळे या महागाईत सर्वसामान्य कुटूंबाचे बजेट पूर्णत: कोडमडले आहे. यामुळे या महागाईच्या काळात सर्वसामान्यानी जगावे कसे?
- शरीफा सय्यद, गृहीणी, लोहारा
दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावात महागाईला देखील सामोरे जावे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना महागाईवर देखील नियंत्रण येईल, अशी अशा होती. मात्र, नियंत्रण सोडा, उलट महागाईचा आलेख चढतच चालला आहे.
- सविता जाधव, गृहीणी, लोहारा
म्हणून वाढले मसाल्याचे दर
मार्च-एप्रिलमध्ये नवीन मसाले येतात. परंतु, जुननंतर मसाल्याचा स्टॉक मार्केटमध्ये कमी प्रमाणात असल्याने भाव वाढ होत आहे. त्यातच पेट्रोल - डिझेलचेही दरवाढ झाली असल्याने मसाल्याच्या दरावर याचा परिणाम जाणवत आहे.
- जहाँगीर मोमीन, मसाला व्यापारी, लोहारा
पेट्रोल - डिझेलच्या दरवाढीमुळे दिवसेंदिवस महागाई वाढत असताना याचा फटका जीवनावश्यक वस्तुंच्या दराला बसत आहे. त्यातच जीएसटी, डीटीएस यामुळे देखील सर्वच मालाचे भाव वाढत आहेत. मसाल्याचे पदार्थ देखील यातून सुटलेले नाहीत.
- प्रशांत जट्टे, किराणा व्यापारी,लोहारा
असे वाढले दर (किलोमध्ये)
रामपत्री
जुने दर - ७५०
नवीन दर - ९००
बदामफूल
जुने दर - ११००
नवीन दर - १३००
जिरे
जुने दर - १७०
नवीन दर - १९०
काळी मिरी
जुने दर - ४५०
नवीन दर - ५००
नाकेश्वरी
जुने दर - २२००
नवीन दर - १६००