शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

तानाजी सावंतांचा शिवसेनेला दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 4:06 AM

मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेने नेते आ. तानाजी सावंत यांच्या गटाने भाजपला साथ दिल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तोंडघशी पडावे लागले.

उस्मानाबाद : मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेने नेते आ. तानाजी सावंत यांच्या गटाने भाजपला साथ दिल्यामुळेजिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तोंडघशी पडावे लागले. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या भाजप समर्थक सदस्या अस्मिता कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी सेनेच्या बंडखोर गटाचे धनंजय सावंत यांची वर्णी लागली़जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे २६ पैकी १७ सदस्य हे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठिशी राहिले. याशिवाय, भाजपचे ४, सेनेच्या बंडखोर गटाचे ७, काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी एक, असे ३० मतांचे गणित जिल्हा परिषदेत जुळून आले. भाजप नेते आ. राणाजगजितसिंह पाटील व आ. सुजितसिंह ठाकूर यांनी पुढाकार घेत हे समीकरण जुळवून आणले. आ. तानाजी सावंत यांचा सेनेतील समर्थक सदस्यांचा मोठा गट फुटून भाजपला मिळाला़ १० पैकी ७ सदस्य या बंडखोर गटात सामील झाले.याबदल्यात भाजपने सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उपाध्यक्षपद बहाल केले. त्यामुळे महाविकास आघाडीला व पर्यायाने शिवसेनेलाच पराभव पहावा लागला आहे़ दरम्यान, मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या सावंतांनी आपले उपद्रवमूल्य दाखविण्यासाठीच हा निर्णय घेतल्याची चर्चा असून, शिवसेनेतील पदाधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता करू लागले आहेत.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतZP Electionजिल्हा परिषद