गर्दीचा फायदा घेत, मंगळसूत्र चोरणारी महिलेस पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST2021-01-14T04:26:54+5:302021-01-14T04:26:54+5:30
कळंब : बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी तात्काळ ...

गर्दीचा फायदा घेत, मंगळसूत्र चोरणारी महिलेस पकडले
कळंब : बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी तात्काळ अटक केली. ही घटना ११ जानेवारी रोजी येथील स्थानकात घडली.
तालुक्यातील शिराढोण येथील सत्यभामा खरबडे हे ११ जानेवारी रोजी शहरातील बस स्थानकात एका बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत, एका महिलेने खरबडे यांच्या गळ्यातील सुमारे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबडून तेथून पोबारा केला. यावर सत्यभामा यांनी लागलीच आरडाओरड सुरू केल्याने, बस स्थानक व परिसरात पायी गस्तीस असलेले पोलीस अंमलदार दहिहांडे, कोळेकर, शिरसठ, बोकलवार, हांगे, राऊत यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान तोडकर, काळे तेथे धावून गेले. यावेळी सत्यभामा यांनी घटनेची माहिती देत, महिलेचे वर्णन सांगितल्यानंतर, या कर्मचाऱ्यांनी स्थानक आवारातूनच ताई नाना दुबळे (रा. कोरफळा, ता. बार्शी) या महिलेस ताब्यात घेतले. यावेळी सत्यभामा यांचे मंगळसूत्र दुबळे यांच्याकडे आढळून आल्यानंतर, खरबडे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.