वैष्णव मारवाडकर याचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:30 IST2021-03-28T04:30:33+5:302021-03-28T04:30:33+5:30
उस्मानाबाद : बाल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेत गोरेवाडी येथील वैष्णव मारवाडकर याने तिसरी ते पाचवी गटातून पत्रलेखन प्रकारातून ...

वैष्णव मारवाडकर याचे यश
उस्मानाबाद : बाल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेत गोरेवाडी येथील वैष्णव मारवाडकर याने तिसरी ते पाचवी गटातून पत्रलेखन प्रकारातून तृतीय क्रमांक मिळविला. याबद्दल शालेय समितीच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला. त्याला काळे, देशमुख, नवले यांचे मार्गदर्शन लाभले.
नियमांचे पालन
गुंजोटी : येथील श्रीकृष्ण महाविद्यालयात सध्या विद्यापीठस्तरीय परीक्षांना सुरुवात झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता, महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची ऑक्सिजन पातळी, ताप तपासूनच परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येत आहे. शिवाय प्रत्येकाला मास्क, सॅनिटायझर बंधनकारक केले आहे.
रस्त्याची दुरवस्था
(फाईल फोटो)
उस्मानाबाद : शहरातील बँक कॉलनी, पोस्ट कॉलनी भागातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, पालिका प्रशासनाने हे खड्डे बुजविण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी या भागातील रहिवाशांमधून केली जात आहे.
अवैध धंदे वाढले
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूरसह परिसरातील गावात मटका, जुगार, अवैध दारू विक्री यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तरुण पिढी याच्या आहारी जात असून, याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.