श्री तुळजाभवानी देवीची विशेष अलंकार महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:31 IST2021-05-15T04:31:37+5:302021-05-15T04:31:37+5:30
पहाटे चरणतीर्थ विधी झाल्यावर तुळजाभवानीची पंचामृत अभिषेक पूजा पार पडली. यावेळी उपस्थित भोपी पुजाऱ्यांनी श्री तुळजाभवानीची आमरास मांडून विशेष ...

श्री तुळजाभवानी देवीची विशेष अलंकार महापूजा
पहाटे चरणतीर्थ विधी झाल्यावर तुळजाभवानीची पंचामृत अभिषेक पूजा पार पडली. यावेळी उपस्थित भोपी पुजाऱ्यांनी श्री तुळजाभवानीची आमरास मांडून विशेष अलंकार महापूजा मांडली. या महापूजेत नियमित अलंकारऐवजी विशेष सणासुदीला व शुभ मुहूर्तास घालण्यात येणारे हिरेजडित माणिक, पाचू, मोती, सोने यांचे विविध प्रकारचे अलंकार देवीस टाकले होते. त्यानंतर श्री तुळजाभवानी देवीस दैनंदिन नैवेद्य दाखवून धुपारती, अंगारा हे विधी पार पडले. या पूजेनंतर भोपे पुजारी वीरेंद्र पाटील, मोहन पाटील यांनी ओला अंगारा काढून श्री तुळजाभवानी मंदिरास प्रदक्षिणा घातली. यानंतर दुपारी श्री तुळजाभवानीस अक्षयतृतीयेनिमित्त आमरस, पुरणपोळी, भात व भाजी याचा विशेष नैवेद्य दाखवण्यात आला. यानंतर देवीस लिंबू-सरबत दाखविण्यात आले. यावेळी महंत वाकोजी, महंत हमरोजी, भोपे पुजारी सुहास भैयै, अतुल मलबा, सेवेकरी, गोंधळी व मंदिर कर्मचारी उपस्थित होते.