शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट, येळकोटचा जयघोष; ढोलकीच्या निनादात आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

By गणेश कुलकर्णी | Updated: September 18, 2023 16:50 IST

तुळजापुरात आरक्षणासाठी धनगर समाज एकटवला

धाराशिव : ‘कोण म्हणतंय देत न्हाई, घेतल्या शिवाय राहत न्हाई’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’ चा गजर करीत अन् ढोलकीच्या निनादात धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज श्री क्षेत्र तुळजापुरात भव्य मोर्चा काढला. यानंतर जुना बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चास सुरूवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दीपक चौक, भवानी रोड, महाद्वार रोड, आर्य चौक, कमान वेस, मंगळवार पेठ, तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय येथून येऊन जुना बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी समाज बांधवांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या भुमिकेवर संताप व्यक्त करीत आणखी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. डोक्यावर पिवळी टोपी घालून धनगर समाज मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. 

यावेळी धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्यावे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक तुळजापूर व नळदुर्ग शहरात उभारावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी डॉ. जितेंद्र डोलारे, बालाजी बंडगर, बाबा श्रीनामे, समाधान देवगुंडे, चेतन बंडगर, राम जवान, ज्ञानेश्वर घोडके, गणेश सोनटक्के, अण्णा बंडगर, सुरेश कोकरे, देविदास पाटील, प्रमोद दाणे, सुदर्शन पांढरे, गणेश सोनटक्के आदी धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

स्मारकासाठी पन्नास लाखांचा निधी देणारधनगर समाजाच्या मागण्या या न्यायी, रास्त आहेत. त्यासाठी माझा पाठींबा आहे. तुळजापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोकळ्या जागेत उभा केला जाईल. त्यासाठी ५० लाख रूपायाचा निधी देण्याचा शब्द देतो. अहिल्यादेवी होळकर यांच्या आजोळात चोराखळी येथे भव्यस्मारक, शिक्षणासाठी अद्यावत अभ्यासिका व्हावी अशी मागणी होती. यासाठीही आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आंदोलकांसमोर बोलताना दिली.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादreservationआरक्षणDhangar Reservationधनगर आरक्षण