येळी येथील दुकान फाेडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:47+5:302021-08-19T04:35:47+5:30

दुचाकी लंपास, गुन्हा दाखल उस्मानाबाद - शहरातील सांजा चाैकातील शिवाजी संभाजी चिखले यांची दुचाकी अज्ञाताने १७ ऑगस्टच्या मध्यरात्री लंपास ...

The shop at Yeli was torn down | येळी येथील दुकान फाेडले

येळी येथील दुकान फाेडले

दुचाकी लंपास, गुन्हा दाखल

उस्मानाबाद - शहरातील सांजा चाैकातील शिवाजी संभाजी चिखले यांची दुचाकी अज्ञाताने १७ ऑगस्टच्या मध्यरात्री लंपास केली. दुचाकी चाेरीस गेल्याचे समाेर आल्यानंतर चिखले यांनी आनंदनगर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध भादंसंचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

२५२ वाहन चालकांना ६१ हजारांचा दंड

उस्मानाबाद - माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील १८ पाेलीस ठाणी तसेच वाहतूक शाखेकडून सुमारे २५२ चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे ६१ हजार ९०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे चालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

Web Title: The shop at Yeli was torn down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.