धक्कादायक ! दुसरी मुलगीच झाल्याने पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 19:26 IST2021-04-28T19:26:07+5:302021-04-28T19:26:34+5:30

उमरगा तालुक्यातील येनेगूर येथील बाबानगरमध्ये राहणारे चंद्रकांत कुंडलिक गायकवाड (४२) यांच्या पत्नीस मंगळवारी मुलगी झाली.

Shocking! Father commits suicide by giving birth to second daughter | धक्कादायक ! दुसरी मुलगीच झाल्याने पित्याची आत्महत्या

धक्कादायक ! दुसरी मुलगीच झाल्याने पित्याची आत्महत्या

येणेगूर (जि. उस्मानाबाद) : दुसरीही मुलगीच झाली म्हणून येणेगूर येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघड झाली. याबाबत मुरूम ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

उमरगा तालुक्यातील येनेगूर येथील बाबानगरमध्ये राहणारे चंद्रकांत कुंडलिक गायकवाड (४२) यांच्या पत्नीस मंगळवारी मुलगी झाली. या जन्माची माहिती चंद्रकांत यांना मिळाल्यानंतर विमनस्क अवस्थेत बुधवारी पहाटे राहत्या घरातील पंख्याच्या कोयंडाला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच येणेगूर दूरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी यशवंत सगर, भीमराव समुद्रे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदन येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. साईनाथ जळकोटे यांनी केले. यानंतर मृताचे भाऊ परमेश्वर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मुरूम ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.

Web Title: Shocking! Father commits suicide by giving birth to second daughter