धक्कादायक ! जीममध्ये वर्कआउट करताना हार्टअटॅक, ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 20:13 IST2024-09-26T20:11:57+5:302024-09-26T20:13:32+5:30
धाराशिव शहरातील घटना, जीममध्ये व्यायाम करताना अचानक कोसळले

धक्कादायक ! जीममध्ये वर्कआउट करताना हार्टअटॅक, ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
धाराशिव : जीममध्ये व्यायाम (वर्कआउट) करीत असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील महादेव उर्फ बाळू लक्ष्मण चव्हाण (४२, ह.मु. उंबरे काेठा, धाराशिव) यांचा एका मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरात घडली.
चव्हाण हे बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरातील बस्थानक परिसरात असलेल्या एका जीममध्ये व्यायामासाठी गेले हाेते. व्यायाम करीत असतानाच साधारणत: आठ वाजण्याच्या सुमारास अचानक हृदयविकाराचा धक्का बसून ते खाली काेसळले. त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, ताेवर त्यांची प्राणज्याेत मालवली हाेती. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी एकंबी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दाेन मुले, भाऊ, बहीण, पुतणे असा परिवार आहे.