शिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST2021-02-06T05:00:40+5:302021-02-06T05:00:40+5:30

कळंब : शहरात घाणीचे साम्राज्य असून, शहरातील प्रत्येक भागात कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. नाल्यांची सफाई केली जात नसल्याने ...

Shiv Sena warned of agitation | शिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा

शिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा

कळंब : शहरात घाणीचे साम्राज्य असून, शहरातील प्रत्येक भागात कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. नाल्यांची सफाई केली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे डेंग्यू व मलेरियाची साथ वाढली आहे. हा प्रश्न लक्षात घेता, पालिकेने तातडीने शहरात स्वच्छता माेहीम राबवावी, नागरिकांच्या आराेग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चाैकशी करावी आदी मागण्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. हे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदाेलन करू, असा इशाराही दिला. निवेदनावर तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, शहरप्रमुख प्रदीप मेटे, शाम खबाले, नगरसेवक सतीश टोणगे, अनंत वाघमारे, रोहन पारख, बबन जावळे, सुरेश शिंदे, गजानन चोंदे, शिवाजी कदम, अजित गुरव, बबलू चोंदे, रोहित वाघमारे, अनिल पवार, सुनील पवार, ॲड.मंदार मुळीक, रोहित कापसे, किरण राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Shiv Sena warned of agitation