शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

तीस कर्मचाऱ्यांमार्फत अपात्र शिधापत्रिकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:35 IST

लोहारा : सार्वजनिक धान्य वितरणप्रणालीतील अनियमिता आणि गळती रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्या अनुषंगाने तालुक्‍यात ...

लोहारा : सार्वजनिक धान्य वितरणप्रणालीतील अनियमिता आणि गळती रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्या अनुषंगाने तालुक्‍यात १२ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोधमोहीम राबविण्यात येत असून, यासाठी तीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

तालुक्यात एकूण .......... शिधापत्रिकाधारक असून, या मोहिमेदरम्यान बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्वच शिधापत्रिकांची कोटकोरपणे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी अव्‍वल कारकून, मंडल अधिकारी, तलाठी व लिपिक यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच तपासणीअंती शिधापत्रिकांची दोन गटांत विभागणी केली जाईल. यात एक लाखापेक्षा जास्‍त उत्‍पन्‍न असणाऱ्या छाननीनंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी ‘गट-अ’ म्हणून केली जाईल. तर ‘गट-ब’मध्ये पुरेसा पुरावा न देणाऱ्यांची नोंद घेतली जाणार आहे. ‘गट अ’मधील शिधापत्रिकाधारकांची शिधापत्रिका पूर्ववत चालू राहील. मात्र, गट बमधील शिधापत्रिका निलंबित करण्याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. गट ब यादीमधील निलंबित केलेल्‍या शिधापत्रिकाधारकांना पुन्हा पंधरा दिवसांची मुदत देऊन त्‍या कालावधीत त्यांनी त्‍या भागात राहात असल्याबाबतचा सबळ पुरावा देणे आवश्यक आहे. मुदतीत हा पुरवा नाही दिल्‍यास त्यांची शिधापत्रिका रद्द करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. सदरील कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करावयाची असल्याचे पुरवठा विभागातील लिपिक बालाजी चामे यांनी सांगितले.

संशयास्पद पुराव्यांची पोलिसांमार्फत चौकशी

पुराव्‍यामध्‍ये छाननी करताना संशयास्‍पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्‍याबाबत पोलिसांमार्फत तपासणी करण्‍याच्‍या सूचनादेखील देण्‍यात आल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे, दुबार, अस्‍तित्वात नसलेल्‍या व्‍यक्‍ती, स्‍थलांतरित व्‍यक्‍ती, मयत व्‍यक्‍ती या लाभार्थींना वगळणच्‍या सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत.

‘त्या’ शिधापत्रिका ठरणार अपात्र

शिधापत्रिकांची तपासणी करतेवेळी एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका असणार नाहीत यादी दक्षता घेण्‍याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसचे शसकीय, निमशासकीय, कार्यालयातील कर्मचारी, खासगी कंपन्‍यांमधील कर्मचारी/कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्‍न एक लाखापेक्षा जास्‍त असल्यास अशांच्या शिधापत्रिका तत्‍काळ अपात्र ठरवण्यात येणार आहेत.