शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन एमआयडीसीसाठी उद्योगमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

लोहारा : लोहारा येथे नवीन एमआयडीसीची निर्मिती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे ...

लोहारा : लोहारा येथे नवीन एमआयडीसीची निर्मिती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, तसेच महिनाभरात मंजुरी न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, लोहारा तालुक्याची निर्मिती सन १९९९ झाली असून, या तालुक्यात ४७ गावे व ४४ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याचे एकूण मतदान ९५ हजार इतके असून, तालुक्याची लोकसंख्या १ लाख २५ हजार आहे. तालुक्यात जमिनीचे एकूण क्षेत्र ५४ हजार हेक्‍टर इतके असून, लागवडी योग्य क्षेत्र ४८ हजार हेक्‍टर आहे. जमिनीचे क्षेत्र कमी व लोकसंख्या जास्त अशी स्थिती असून, तालुक्यात एक खासगी साखर कारखाना वगळता, इतर कुठलाही मोठा उद्योग धंदा नसल्याने केवळ शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. शेतीही बेभरवशाची व अल्प उत्पन्नाची झाल्याने नागरिकांची आर्थिक कुचंबणा होत आहे.

नीति आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा संपूर्ण भारतात क्रमांक दोनचा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यात लोहारा तालुक्याचे दरडोई उत्पन्न व वार्षिक उत्पन्न अत्यंत कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी रोजगाराच्या सोयी उपलब्ध होणे गरजेचे आहे. रोजगाराच्या निमित्ताने या तालुक्यातील नागरिक व युवक पुणे-मुंबई येथे राहतात. त्यामुळे त्यांना या तालुक्यात रोजगार उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. या तालुक्यात एमआयडीसीची निर्मिती झाल्यास, अनेक नवीन उद्योजकही निर्माण होतील. यासाठी येथे नवीन एमआयडीसी निर्माण करून, या तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.