डोंजा गावात सचिनने लुटला विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 14:00 IST2017-12-19T13:18:32+5:302017-12-19T14:00:33+5:30

सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावात खासदार सचिन तेंडुलकरचे आज सकाळी आगमन झाले. यावेळी सचिनने गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला.

Sachin enjoys cricket with looted students in Donja village | डोंजा गावात सचिनने लुटला विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंद

डोंजा गावात सचिनने लुटला विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंद

उस्मानाबाद : सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावात खासदार सचिन तेंडुलकरचे आज सकाळी आगमन झाले. यावेळी सचिनने गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला.

गावात दाखल होताच ग्रामस्थांकडून झालेल्या जंगी स्वागतानंतर सचिनने पहिल्यांदा येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन बांधकामाची पाहणी केली़ त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर जाऊन विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. मात्र, सचिनच्या चाहत्यांनी मैदान गच्च भरले होते़ अगदी पिचभोवतीही गराडा पडल्याने सचिनला मनसोक्त टोलेबाजी करता आली नाही़ त्याने विद्यार्थ्यांनी केलेल्या गोलंदाजीवर ‘डिफेन्स’चे कौशल्य सादर केले

यानंतर शाळेच्या बंद खोलीत काही मोजक्या विद्यार्थ्यांसोबत त्याने संवाद साधून खेळाइतकेच शिक्षणही महत्वाचे सांगितले व विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या़ शाळेच्या बांधकामासोबतच सचिन गावातील विविध विकासकामांची पाहणी पायी फिरुन करणार आहे़ तसेच ग्रामस्थांशी संवादही साधणार आहे.

सचिनच्या स्वागतासाठी उभारल्या गुढी 
प्रत्येक घरावर गुढी उभारण्यात आली असून, दारात रांगोळ्या सजल्या आहेत. गावच्या वेशीतच भव्य अशी कमान लक्ष वेधत आहे. गावातील अबाल-वृद्ध सचिनची आतुरतेने वाट पाहत होती.

Web Title: Sachin enjoys cricket with looted students in Donja village