Video: धाराशिवमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ; सशस्त्र आठ ते दहाजणांनी घर फाेडले

By बाबुराव चव्हाण | Updated: July 16, 2024 12:31 IST2024-07-16T12:26:47+5:302024-07-16T12:31:53+5:30

धाराशिव शहरातील गांधीनगर भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ; ‘सीसीटीव्ही’त घटना कैद

Robbers rampage in Dharashiv; Eight to ten armed men ransacked the house | Video: धाराशिवमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ; सशस्त्र आठ ते दहाजणांनी घर फाेडले

Video: धाराशिवमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ; सशस्त्र आठ ते दहाजणांनी घर फाेडले

धाराशिव : शहरातील गांधीनगर भागात जवळपास आठ ते दहा दराेडेखाेरांच्या टाेळीने मंगळवारी पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घालून घरफाेडी केली. हे सशस्त्र दराेडेखाेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

जिल्ह्यात चाेरीच्या घटनांचे सत्र सुरू आहे. असे असतानाच मंगळवारी पहाटेच्या सुमारास सशस्त्र आठ ते दहा दराेडेखाेरांच्या टाेळीने धाराशिव शहरातील गांधीनगर भागात धुमाकूळ घातला. हाती शस्त्र घेऊन हे दराेडेखाेर बिनधास्त वावरत हाेते. याच टाेळीने साधारपणे सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घरफाेडी केली. माहिती मिळताच धाराशिव शहर ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. दरम्यान, घटनेत काेणकाेणत्या स्वरूपाचा किती मुद्देमाल चाेरीला गेला, पंचनाम्यानंतरच स्पष्ट हाेईल.

Web Title: Robbers rampage in Dharashiv; Eight to ten armed men ransacked the house