‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ ही सर्वांची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:59+5:302021-02-06T04:58:59+5:30
उस्मानाबाद - रस्त्यावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात टाळण्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणे गरजेचे आहे. ‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ ही ...

‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ ही सर्वांची जबाबदारी
उस्मानाबाद - रस्त्यावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात टाळण्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणे गरजेचे आहे. ‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी व्यक्त केले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शुक्रवारी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला गृहविभागाने काढलेल्या परिपत्रकाचे वाचन केले. यानंतर प्रत्येक मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. रस्त्यावरील अपघाताशी माझा काही संबंध नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही. कारण रस्त्याशी संबंध येत नाही, असा व्यक्ती असूच शकत नाही. कोणत्या ना कोणत्याप्रकारे वाहन चालविणे, वाहनात बसणे, रस्त्यावर पायी चालणे अशाप्रकारे प्रत्येकाचा रस्त्याशी संबंध हा येतच असतो. त्यामुळे प्रत्येकाने रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहनधारकाने वाहन चालविताना सर्व प्रकारची खबरदारी घेणे, रस्ता ओलांडताना दक्ष राहणे, वाहनात बसलेल्याने वाहन चालकास वाहन जोरात चालविण्यास किंवा नियमांचे उल्लंघन करून चालविण्यास भाग न पाडणे आदी बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास अपघाती घटना टळतील, असे डाॅ. फड म्हणाले.
बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, कार्यकारी अभियंता (बां.) नितीन भोसले, कार्यकारी अभियंता दशरथ देवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बळीराम निपाणीकर, कृषी विकास अधिकारी डाॅ. तानाजी चिमनशेट्टे, कार्यकारी अभियंता (ल. पा.) व्ही. व्ही. जोशी आदींची उपस्थिती हाेती.