तुळजापूर तहसीलसमोर रिपाइंने केली निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST2021-08-26T04:34:24+5:302021-08-26T04:34:24+5:30
यावेयी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात सोलापूर जिल्ह्यातील माळवाडी (बोरगाव) येथे मातंग समाजातील मयत गोविंद साठे यांच्या प्रेतावर स्मशानभूमीत ...

तुळजापूर तहसीलसमोर रिपाइंने केली निदर्शने
यावेयी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात सोलापूर जिल्ह्यातील माळवाडी (बोरगाव) येथे मातंग समाजातील मयत गोविंद साठे यांच्या प्रेतावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील जातीयवादी लोकांनी जातीवाचक शिवीगाळ करून विरोध केला. त्यामुळे ग्रामपंचायतीपुढे अंत्यसंस्कार करावा लागला. चंद्रपूर जिल्ह्यातील वणी (खुर्द) येथेही ‘जादूटोणा, अंधश्रद्धा विरोधी प्रतिबंधात्मक कायदा हातात घेऊन करणी भानामती करता’, असा आरोप करीत मागासवर्गीय समाजातील लोकांना मारहाण झाली. या दोन्ही घटना निंदनीय असून, यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी. तसेच तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अनाधिकृत बांधकाम पाडावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
आंदोलनात रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, सचिव एस. के. गायकवाड, युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, बाबासाहेब मस्के, प्रकाश कदम, शहराध्यक्ष अरुण कदम, अमोल कदम, प्रा. अशोक कांबळे, राज कदम, नरेंद्र शिंदे, हणमंत सोनवने, तानाजी डावरे, संजय पारधे, चंद्रकांत डावरे, रावण सोनवने, भीमराव कदम, बापू भालेकर, विशाल सोनवने, अनिकेत सोनवणे, आभिमान नाकतोडे, चंचल कदम, श्रावण कदम, विनोद भालेकर, बाळू सिरसट, सुलेमान शेख, बापू शिंदे आदी सहभागी झाले होते.