दाेन कारची धडक, दाेघेजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST2021-01-16T04:37:09+5:302021-01-16T04:37:09+5:30
तुळजापूर : दाेन कारमध्ये झालेल्या अपघातात दाेघेजण जखमी झाले. ही घटना १५ जानेवारी राेजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तुळजापूर-रत्नागिरी ...

दाेन कारची धडक, दाेघेजण जखमी
तुळजापूर : दाेन कारमध्ये झालेल्या अपघातात दाेघेजण जखमी झाले. ही घटना १५ जानेवारी राेजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तुळजापूर-रत्नागिरी राज्य मार्गावरील बाह्यवळण रस्त्यावरील मुख्य चाैकात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबादहून बायपास रस्त्याने सोलापूरकडे जाणार्या भरधाव कारला (क्र. एमएच.२४- एयू. ०९३४) लातूरहून तुळजापूरकडे जाणाऱ्या कारने (क्र.एमएच.२० -सीएस. ३६५४) जोराची धडक दिली. या अपघातात साेलापूरकडे निघालेली कार उलटून दाेघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य एकजण किरकोळ जखमी झाले आहेत.
पाॅईंटर...
लातूरहून आलेल्या कारच्या चालकाने ताब्यातील वाहनाचे बंपर तुटून पडले हाेते. हे न पाहताच चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पाेबारा केला. त्यामुळे उपस्थित लाेकांनी रूग्णवाहिकेस पाचारण करून जखमींना दवाखान्यात दाखल केले.