जिल्हाधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST2021-08-26T04:34:08+5:302021-08-26T04:34:08+5:30

यावेळी सर्व संबंधित विभागप्रमुखांच्या उपस्थितीत विषयनिहाय आणि प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२१ पासून राष्ट्रीय पोषण ...

Review of schemes by the Collector | जिल्हाधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा

यावेळी सर्व संबंधित विभागप्रमुखांच्या उपस्थितीत विषयनिहाय आणि प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२१ पासून राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे. यात महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, अन्न व औषध प्रशासन, महिला व आर्थिक विकास महामंडळ यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिल्या. घेतलेल्या कार्यक्रमाच्या नोंदी पोषण अभियान या वेबसाईटवर नोंदविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधितांना सूचना दिल्या.

बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रत्नमाला टेकाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, शिक्षणाधिकारी अरविंद मोहिरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चौगुले, जि. प. चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) बी. एच. निपाणीकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कुलकर्णी तसेच जिल्ह्यातील आठ बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Review of schemes by the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.